प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा को-ऑप. बँक असोसिएशनवतीने सहकारी बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर व सीईओ यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष बाळाण्णा कग्गणगी होते.
प्रारंभी गौरवाध्यक्ष एम. डी. चुनमरी यांनी प्रास्ताविक केले. महालक्ष्मी अर्बन बँक गोकाकचे चेअरमन बाळासाहेब जिवाजी मांगलेकर यांना कर्नाटक सरकारचा ‘सहकाररत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल असोसिएशनचे डायरेक्टर व हारुगेरी जनता सहकारी बँकेचे चेअरमन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे व्हा. चेअरमन बाळासाहेब काकतकर, खजिनदार ए. के. महाजनशेट्टी, संचालक आर. टी. शिराळकर, सेपेटरी पी. एस. ओऊळकर, दैवज्ञ बँकेचे माजी जनरल मॅनेजर एम. एस. शेठ, शांतापण्णा मिरजी बँकेचे माजी जनरल मॅनेजर बी. ए. भोजकर उपस्थित होते.
कार्यशाळेत गोकाक अर्बन बँकेचे जनरल मॅनेजर एस. एस. पाटील यांनी बी. आर. कायदा 1949 (एएसीएस) मधील झालेले बदल व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा को-ऑप. अर्बन बँक असोसिएशनचे पदाधिकारी वाय. एस. मिरजी, एस. बी. निलजगी, एस. एम. रेवणकर, मराठा बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर व बेळगाव जिल्हय़ातील विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.









