Dhairyasheel Mane News : खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. नीतेश पाटील यांनी रविवारी हा आदेश बजावला असून, महामेळाव्यात भाग घेण्यासाठी येणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एम.बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ.संजीव पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचा आदेश जारी केला असून व्हॅक्सिन डेपो मैदानात होणाऱ्या महामेळाव्यात भाग घेऊन ते प्रक्षोभक वक्तव्य करू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या मालमत्तेचेही नुकसान होऊ शकते. मराठी भाषिकांना चिथावणी देण्याची शक्यता असल्याचे सांगून 19 डिसेंबर रोजी त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
Previous Articleपार्किंगतळ उभारण्यास महापालिका अपयशी
Next Article रणमाले महोत्सवामुळे पारंपरिक कलेला नवीन आयाम








