बेळगाव : बेळगाव विकास पॅनेलने चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे कामकाज समाजाभिमुख बनविले. यापूर्वी चेंबर ऑफ कॉमर्स सक्रिय नसल्याचा आणि व्यावसायिकांच्या बाजूने काम करीत नसल्याचा आरोप झाला होता. नंतरच्या काळात विकास पॅनेलच्या माध्यमातून समान विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणण्यात आल्याची माहिती उद्योजक चैतन्य कुलकर्णी यांनी दिली.
बेळगाव डेव्हलपमेंट पॅनेलच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, सचिव सतीश कुलकर्णी, उपाध्यक्ष स्वप्नील शहा, उदय जोशी, कोषाध्यक्ष संजय पोतदार, माजी अध्यक्ष रोहन जुवळी, श्रीधर उप्पीन, संजीव कट्टीशेट्टी, सी. सी. होंदडकट्टी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन सबनीस म्हणाले, विकास पॅनेलच्या स्थापनेपासून चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रशासनात बरेच बदल झाले आहेत. सध्याचे पदाधिकारी नि:स्वार्थपणे काम करीत आहेत. भविष्यात सर्वांनी समाज आणि शहरासाठी काम केले पाहिजे, असे म्हणाले. यावेळी राजेंद्र मुतगेकर, विक्रम जैन, सुनील नाईक, संदीप बागेवाडी, आप्पासाहेब गुरव, आनंद देसाई, किथमचॉडो, राजेश मुचंडीकर यांसह इतर उपस्थित होते.









