बेळगाव : बेळगाव -चोर्ला रोडची दोन माहिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यातच या रस्त्याची दुरवस्था झाली असून संबंधीत विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. हा मार्ग गोव्याशी जोडलेला असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. यात अवजड वाहनांचाहि समावेश आहे. शिवाय हा मार्ग घाटमाथ्यावरून जात असल्यामुळे मोठी वळणे आहेत. त्यात रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिकच धोकादायक बनली आहे. त्यामुळे संबंधित खात्याने या मार्गाची तातडीने आणि दीर्घकाळ टिकेल अशी दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशी आणि वाहनधारकांमधून होत आहे.









