बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन आयोजित 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या जिल्हास्तरीय वकील व ज्युडीकल यांच्यात झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात बेळगाव बार असोशियन संघाने चिकोडी बार असोसिएशन संघाचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. वेणूग्राम संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोर्ट आवारात आयोजित करण्यात आलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत तालुक्यातील बार असोसिएशनच्या 13 संघानी भाग घेतला होता. पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात बेळगाव बार असोसिएशन संघाने वेणूग्राम संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दसऱ्या उपांत्य सामन्यात चिकोडी संघाने आरसीबी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात बेळगाव बार असोशियन संघाने चिकोडी बार असोसिएशन संघाचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकाच्या झालेल्या सामन्यात वेणूग्राम संघाने आरसीबी संघाचा पराभव केला. बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष एस एस किडसन्न्नवर, वाय के दिवटे, बसवराज मोगली, विजयकुमार पाटील ,आर पी पाटील शंकर गणमुखी एस पी उत्तुरे मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव बार असोसिएशन संघाला दहा हजार ऊपये रोख व आकर्षक चषक, उपविजेत्याला सात हजार ऊपये, आकर्षक चषक तर तिसरा क्रमांक पटकावलेल्या वेणूग्राम संघाला पाच हजार ऊपये व चषक देऊन गौरविण्यात आले अभिषेक एम. के उत्कृष्ट स्मॅशर, बसवराज देवरमणी उत्कृष्ट लिफ्टर तर ऑल अंडर खेळाडू म्हणून विनय पाटील यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.









