बेळगाव : बेळगाव बार असोशिएशनतर्फे बेळगाव न्यायालयातील बढ़तीनिमित्त बदली झालेल्या तीन न्यायाधिशांचा गणपती भट, प्रधान दिवाणी न्यायाधिश द्वितीय श्रेणी शर्मिला कामत, प्रथम अतिरिक्त दिवाणी न्यायाधिश द्वितीय श्रेणी व थी संजीवकुमार वं हिंडोड्डी, साळवे ओ. एम.एफ.सी. यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.
निरोप समारंभ कार्यक्रम बेळगांव बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रधान सत्र जिल्हा न्यायाधिश एल. विजयालक्ष्मीदेवी उपस्थित होत्या.
याप्रसंगी सन्मान मूर्तीनी बेळगाव न्यायालयातील आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी बेळगाव बार असोसिशनचे सचिव गिरीश पाटील, सहसचिव ॲड बंटी कपाई, उपाध्यक्ष सचिन शिवन्नावर, महिला प्रतिनिधी पूजा पाटील, सदस्य वकील महांतेश पाटील,ॲड. आदर्श पारीक यांच्यासह वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.









