वकिलावर कठोर करवाईसाठी राष्ट्रपतींना निवेदन
बेळगाव : सरन्यायाधीशांवर हल्ला करून वकिलाने बेशिस्त व न्यायाधिशांप्रति अनादरपूर्ण वर्तन केले आहे. वकील हे न्यायव्यवस्थेचे अविभाज्य घटक आहेत. यासाठी प्रत्येकाने व्यावसायिकता व नैतिक वर्तनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. सरन्याधीशांवर झालेल्या हल्ल्याचा बेळगाव बार असोसिएशनकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत असून हल्लेखोर वकिलावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कायदेशीर व्यवस्थेशी संवाद साधताना न्याय व्यवस्थेबद्दल अत्यंत आदर व व्यवस्थेची अखंडता राखणे आपले कर्तव्य आहे. अनादराचे कोणतेही कृत्य केवळ संबंधित व्यक्तीवर वाईट परिणाम करत नाही तर संपूर्ण कायदेशीर व्यवसायाचीही विश्वासर्हतादेखील कमी करते. कायदेशीर बंधुत्वाची प्रतिष्ठ राखण्यासाठी गैरवर्तनाच्या प्रकरणांमध्ये कठोर शिस्तभंगाईची कारवाई करण्यावर बेळगाव बार असोसिएशनही भर देते. देशातील सर्व वकिलांनी न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा राखणे आवश्यक आहे.
प्रत्येकाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाला देशातील लोकांचे महान न्यायालय बनविले पाहिजे. संविधानाच्या अंतर्गत आपण ज्या न्यायव्यवस्थेत राहतो त्याचा मान राखणे ही आपली जबाबदारी आहे. व्यवस्थेबाबत असंवैधानिक कृत्य करणे हे असह्य आहे. न्यायव्यवस्थेला आपण सर्वोच्च स्थान देणे आवश्यक आहे. मात्र हल्ला करण्यासारखे कृत्य हे पूर्णपणे न्यायव्यवस्थेचा अपमान असून असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर करवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बसवराज मुगळी, वाय. के. दिवटे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.









