विद्याभारती राज्य फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : संत मीरा शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय आंतरशालेय मुला मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगांव, धारवाड, मंगळूर ,बेगळूर उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गुडशेफर्ड शाळेच्या आवारातील टर्फ मैदानावर आयोजीत स्पर्धेच्या उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव एस व्ही कुलकर्णी, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे , जिम संघटनेचे सचिव क्रितेश कावळे, ओमकार या मान्यवरांच्यातर्फे भारत माता, सरस्वतीचे, फोटो पूजन, दीपप्रज्वलन, फुटबॉल चेंडूला किक देऊन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभ विद्याभाती बेळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन आणि खेळाडूचे ओळखी करुन घेत स्पर्धेसाठी उपस्थितना खेळाडूना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख सी. आर. पाटील, शिवकुमार सुतार, यश पाटील, अमृता पेटकर, पंच मानस नायक, आदित्य सानी, स्वरूप हलगेकर, प्रणव देसाई, पोर्णिमासह विविध जिह्यातील क्रीडा शिक्षक व सहशिक्षक उपस्थित होते.









