वार्ताहर/किणये
बेळवट्टी येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाने नुकत्याच गजपती येथे झालेल्या तालुकास्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी प्रकारात विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय बेळवट्टी संघाने बी. के. कंग्राळी संघाचा 3 गुणांनी पराभव करत विजेतेपद मिळविले. यांना संस्थेचे अध्यक्ष विजय नंदीहळळी, मुख्याध्यापक जी. एन. तंगणाचे, क्रीडा शिक्षक अजय गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









