वार्ताहर /नंदगड
बेकवाड ग्राम पंचायतीने पाणी, रस्ते, वीज, शाळा, अंगणवाडी व अन्य मूलभूत सुविधा उत्तमप्रकारे राबविल्या आहेत. डिजिटल लायब्ररी, कचरा डेपो इमारत उभारणी तसेच पंचायतीला सोलार सिस्टिम बसवले आहे. या विविध विकास कामांमुळे कर्नाटक सरकारच्या ग्रामीण पंचायत राज खात्यातर्फे बेकवाड ग्रामपंचायतीला यावषीचा गांधीग्राम पुरस्कार प्राप्त झाला. सोमवारी बेंगळूर येथील विशेष कार्यक्रमात पंचायत राज खात्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पंचायत खात्याचे वरिष्ठ अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. बेकवाड ग्रा. पं. अध्यक्षा मोहिनी यळ्ळूरकर, उपाध्यक्षा शबाना मुजावर, पिडीओ नागाप्पा बन्ने, सदस्य यल्लापा गुरव, परशराम मडवाळकर, गजानन पाटील व पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याने बेकवाड ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









