आनंदात ओरडल्याने फुफ्फुसाला पडले छिद्र
जगात एकाहून एक विचित्र घटना घडत असतात. अनेकदा अशा गोष्टी कानावर येतात, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. जोरात ओरडल्याने घश्यावर परिणाम झाल्याचे पाहिले असेल, परंतु कधी ओरडल्याने फुफ्फुसाला छिद्र पडल्याचे ऐकले आहे का? चीनमध्ये एका मुलाच्या फुफ्फुसाला ओरडल्याने मोठे छिद्र पडले आहे.
चीनच्या शेनजेंग येथे राहणाऱ्या 19 वर्षीय मुलासोबत ही विचित्र घटना घडली आहे. हा मुलगा स्वत:च्या पसंतीच्या बँडचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. तेथे अधिक उत्साहित झाल्याने तो जोरात ओरडत होता, यामुळे त्याच्या फुफ्फुसाला छिद्र पडले आहे. मनमोकळेपणाने ओरडल्यानंतर या मुलाला या अजब स्थितीला सामोरे जावे लागले आहे.

या मुलाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. हा मुलगा कॉन्सर्टला उपस्थित होता, बँडच्या परफॉर्मन्सवर अत्यंत आनंदी झाल्याने तो मनमोकळेपणाने ओरडून दाद देत होता. याचदरम्यान त्याच्या छातीत तीव्र वेदना झाली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पाहता-पाहता हा मुलगा बेशुद्ध होऊन कोसळला. या मुलाला शेंजेंग रुग्णालयात नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याच्या फुफ्फुसाला ईजा झाल्याचे सांगितले आहे.
अशाप्रकारची ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. 2017 मध्ये एका चाहत्यालाही अशाचप्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा एक मुलगी कॉन्सर्टदरम्यान जोरात ओरडत होती. याचमुळे तिच्या फुफ्फुसाला नुकसान पोहोचले हेते. याचबरोबर कराओके परफॉर्मन्स आणि गाण्यादरम्यान देखील लोकांना फुफ्फुसांना ईजा पोहोचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.









