वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा 34 वर्षीय वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने मेलबर्न रेनेगेड्स क्लबबरोबर नुकताच नवा करार केला आहे.
मेलबर्न रेनेगेड्सने बेहरेनडॉर्फबरोबर 3 वर्षांच्या कालावधीसाठी हा नवा करार केला आहे. यापूर्वी बेहरेनडॉर्फ या स्पर्धेत पर्थ स्कॉर्चर्स क्लबकडून खेळत होता. पण त्याच्या कराराचे नुतनीकरण करण्यास पर्थ स्कॉर्चर्सने नकार दिल्याने मेलबर्न रेनेगेड्सने त्याच्याशी हा करार केला आहे. एप्रिल महिन्यात बेहरेनडॉर्फ 35 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. बेहरेनडॉर्फने आपल्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 106 सामने खेळले आहेत.









