ज्येष्ठ कीर्तनकार नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे (Nilkanth Dnyaneshwar More) म्हणजेच बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. त्यांच्या अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला. वयाच्या ८९ वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरात त्यांच्या कीर्तनाचे भरपूर कार्यक्रम झाले. महाराष्ट्राच्या गावागावांत त्यांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम झाले. नवी मुंबईतील नेरूळमध्ये ते वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ३ वाजता नेरूळच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Previous Articleदिवाळीपूर्वी दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळावा
Next Article कोजागिरी पौर्णिमेला बांद्यात श्री साईबाबा उत्सव









