वृत्तसस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू फरहान बेहेर्डानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 39 वर्षीय बेहेर्डानने आपल्या 18 वर्षांच्या व्यावसायिक क्रिकेट क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी केली.
2004 साली त्याने प्रथमश्रेणी क्रिकेट पदार्पण केले होते. पण त्यानंतर त्याला तब्बल आठ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले. त्याने 59 वनडे आणि 38 टी-20 सामन्यात 1559 आणि 17 बळी मिळवले आहेत. बेहेर्डानने 2012, 2014 आणि 2016 च्या आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याचप्रमाणे 2015 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 च्या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.









