भारतीय संस्कृतीनुसार लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण असतो. लग्नात प्रत्येक स्त्रीला या प्रसंगी सर्वात सुंदर वधू दिसण्याची इच्छा असते. यासाठी लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी नवरी मुलीची तयारी सुरु होते.त्वचेसोबतच महिला या खास सोहळ्यासाठी केसांची ट्रीटमेंटही घेतात. या हेअर ट्रीटमेंटमध्ये काही जण स्पा करतात तर काही केसांवर केराटिन करतात.पण हेअर ट्रीटमेंट लग्नाआधी घ्यावी की नंतर हे आज आपण जाणून घेऊयात.
लग्नापूर्वी मुली हेअर केराटीन, स्मूथिंग करतात. तसे तर या सर्व ट्रीटमेंटमुळे केस सुंदर होतात. पण लग्नाआधी ते तुम्ही करून घेत असाल,तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. कारण हेअर ट्रीटमेंटचे काम तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवणे आहे. यासोबतच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी देखील काही हेअर ट्रीटमेंट केले जातात. पण लग्नात हेअर स्टायलिंग करण्यासाठी केसांना पावडर आणि बॅक कोम्बच्या मदतीने केस रफ केले जातात. ज्यामुळे तुमचे केस खराब करू शकतात. याशिवाय केसांवरील हीट मुळे देखील केस खराब होऊ शकतात. अशा स्थितीत लग्नानंतर केसांची ट्रीटमेंट घेणे अधिक योग्य ठरेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









