प्रतिनिधी / बेळगाव
सुंगी हंगामातील भातकापणी, मळणी आणि इतर कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीकामात मग्न झाले आहेत. ऐन सुगी हंगामात मधमाशांनी धुमाकूळ घातल्याने शेतकर्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. बेकिनकेरे येथे शनिवारी भातकापणीसाठी गेलेल्या शेतकर्यांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. यामध्ये शेतकर्यांना इजा पोहोचल्याने काम अर्धवट सोडून घर गाठावे लागले आहे. त्यामुळे शिवारातील वाढता मधमाशांचा धुमाकूळ चिंता वाढवणारा ठरला आहे.
Previous Articleदीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश का आहे वेटिंगवर?
Next Article आचरा येथे १५ नोव्हेंबरला वीज ग्राहक मेळावा