वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
24 ऑगस्टपासून येथे सुरु होणाऱ्या 2025 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून स्पेनची महिला टेनिसपटू पाओला बेडोसाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
गेल्या जून महिन्यात झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत बेडोसाला पराभव पत्करावा लागला होता. बेडोसाने माघार घेतल्याने आता तिच्या जागी जिल टिचमनला संधी दिली जाईल, अशी घोषणा अमेरिकन टेनिस संघटनेने केली आहे. गेल्या वर्षी स्पेनच्या कॉर्नेटने टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. पण चालू वर्षीच्या टेनिस हंगामात तिने निवृत्तीनंतर पुनरागमन केले. स्पेनची 27 वर्षीय बेडोसाने महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत सध्या बारावे स्थान मिळविले आहे. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत बेडोसाने उपांत्य फेरी गाठली होती. तर गेल्या वर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.









