बेडग बेडग (ता. मिरज) येथील मल्लेवाडी रस्त्यावरील रेल्वे पुलाचा खालील भाग पाण्यात गेला आहे. गेल्या आठवडाभरापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुलाच्या खाली तळे झाले आहे. पाणी निचऱ्याची सोय नसल्याने वाहनधारकांतून या पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. सध्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. मात्र, पुलाच्या बोगद्याखालील रस्ता केला नसल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बेडग-मल्लेवाडी या सहा किमी रस्ताचे डांबरीकरण करण्यात येत आहे. सलगरे व कवठेमहांकाळकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग
असल्याने हा रस्ता वाहनधारकांना महत्वाचा आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही गावांकडून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली जात होती. रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून रेल्वे हद्दीतील काम प्रलंबित आहे.
रेल्वे हद्दीतील भुयारी मार्गावर फुटांपर्यंत पाणी साचत असल्याने ये-जा करणे मुश्किल बनले आहे. तरी रेल्वेकडून शंभर मीटर अंतर-ातील भुयारी मार्गावर काँक्रीटीकरण करून पाणी निचरा होईल अ-शी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बेडग-मल्लेवाडी व बेडग-मालगाव हे दोन्ही रस्ते डांबरीकरण करण्यात आले असून रेल्वे हद्दीतील भुयारी मार्ग व साचणारे पाणी वाहन धारकांना त्रासदायक ठरत आहे.








