माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांचे आवाहन : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिज ऑरा’ परिषद
पणजी : ‘ब्रिज ऑरा’ ही परिषद शिकणे आणि कृती यातील अंतर कमी करते. विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानात स्किल्ड, रिस्कील्ड आणि अपस्कील्डद्वारे कुशल बनवून नोकरी शोधणाऱ्यांवरून त्यांना नोकरी निर्माण करणारे बनविण्याचे आमचे ध्येय आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी कौशल्यप्राप्त शिक्षण घेऊन नोकऱ्या निर्माण करणारे बनावे, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी केले.
पणजी येथे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘ब्रिज ऑरा 25’ या परिषदेत खंवटे बोलत होते. यावेळी ‘सोफ्युएल्ड’चे संचालक प्रज्योत माईणकर, ओपन डेस्टिनेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद अण्वेकर, फ्लक्सॅटिक ग्लोबलचे संस्थापक शॉन केनेथ फर्नांडिस, टेडएक्स पणजीचे रवी कंभोज, टॉप गोवा टूर्सचे संचालक क्लाइड टेलिस, बिट्स अँड बाइट्सचे व्यवस्थापकीय भागीदार जोसेफ रिबेरो, ड्रलमंकीचे सहसंस्थापक अमेय आर्सेकर पल्लवी नाथ, प्राचार्य ऊबेन फर्नांडिस, अंकिता नागवेकर भाईप, ग्रो विथ सायबरट्रॉमचे संस्थापक शशांक शेट्यो सौदागर उपस्थित होते.
उद्घाटन सत्रात सोफ्युएल्डचे संचालक माईणकर, ओपन डेस्टिनेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अण्वेकर यांनीही विचार मांडले. ‘ब्रिजऑरा 25’ ही परिषद पुढच्या पिढीसाठी लाँचपॅड आहे. पाच प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतल्याने हा राज्यातील या प्रकारचा सर्वात मोठा उपक्रम आहे. ही फक्त सुऊवात आहे, गोव्याच्या तंत्रज्ञान प्रतिभेला प्रशिक्षित, मार्गदर्शन आणि कार्यबलात कसे तैनात केले जाते, याला पुन्हा आकार देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे फ्लक्सॅटिक ग्लोबलचे संस्थापक शॉन केनथ फर्नांडिस म्हणाले.
‘ब्रिजऑरा 25’चा दोन महिने उपक्रम
‘ब्रिजऑरा 25’ हा उपक्रम गोव्यातील सर्वात प्रभावी कौशल्य उपक्रमांपैकी एक आहे, जो पूर्वी टेकस्टॅटिक म्हणून ओळखला जात होता, ज्याने 2022 पासून 700 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ‘ब्रिज ऑरा 25’ ही परिषद पाच प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील 250 हून अधिक विद्यार्थ्यांना दोन महिन्यांच्या कार्यक्रमात सहभागी करून घेत आहे, ज्यामध्ये विविध डोमेनमध्ये 40 तज्ञांच्या नेतृत्वाखालील सत्रे, थेट प्रकल्प आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन समाविष्ट आहे.









