सीमाहद्दीवर धोकादायक प्रवास, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, ग्रामस्थ संतप्त : रस्ता दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी
बेळगाव : कर्नाटक हद्दीतील उचगाव-कोवाड मार्गाचे काम अर्धवट स्थितीत पडून राहिले आहे. दरम्यान, या अर्धवट रस्त्यांकडे दुर्लक्ष करून इतर रस्त्यांच्या विकासकामांना चालना दिली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बेकिनकेरे ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अन्यथा रास्ता रोको करून आंदोलन छेडू, असा इशारा बेकिनकेरे ग्रामस्थांनी दिला आहे. उचगाव क्रॉस ते बेकिनकेरे गावानजिक रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र तेथून पुढे महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा रस्ता अर्धवट असताना दुसरीकडे रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रथमत: अर्धवट स्थितीत असलेला बेकिनकेरे ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत दीड किलो मीटरचा रस्ता डांबरीकरण करावा, अशी मागणीदेखील जोर धरून आहे. उचगाव क्रॉस ते कोवाड मार्गावर बेकिनकेरेनजिक दीड किलोमीटरच्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याची धुळधाण होऊन ख•s पडले आहेत. त्यामुळे वाहनांना ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. मागील दोन तीन वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. उचगावपासून बेकिनकेरे गावानजिक रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. मात्र तेथून पुढे महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना धक्के खातच प्रवास करावा लागत आहे. याबाबत तक्रारी देऊनदेखील सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.
आम्हाला मिक्सर, डबे, कुकर नको, रस्ता करून द्या
सीमाहद्दीवरील या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी नारळ फोडला. मात्र रस्ता अर्धवट राहिला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी केवळ मतांसाठी डबे, कुकर, मिक्सर वाटपात गुंतले आहेत. प्रत्यक्षात लोकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्हाला मिक्सर, डबे, कुकर नको, रस्ता करून द्या, अशी मागणीदेखील काही ग्रामस्थांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्या की, लोकप्रतिनिधांकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडतो. प्रत्यक्षात मात्र जनतेला प्राथमिक सुविधांपासून वंचित रहावे लागते, ही सत्य परिस्थिती आहे. निवडणुका जवळ आल्याने जनतेला आमिषे दाखवून विविध साहित्याचे वाटप होऊ लागले आहे. प्रत्यक्षात सीमाहद्दीवरील बेकिनकेरे रस्त्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे बेकिनकेरेवासियांची ख•sमय रस्त्यातून ये- जा सुरू आहे. य् ाा मार्गावरून कोवाड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील वाहनधारकांची संख्या अधिक आहे. मात्र कर्नाटक हद्दीतील रस्ता अर्धवट स्थितीत पडून राहिला आहे. महाराष्ट्र हद्दीतील रस्ता सुरळीत आहे. मात्र केवळ कर्नाटक हद्दीतील दीड किलोमीटरच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे सीमाहद्दीतील रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जाण्याची प्रचिती येऊ लागली आहे.
अन्यथा आंदोलन छेडू

दीड किलोमीटरच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक ठरु लागली आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणाचा फटका गावकऱ्यांना बसू लागला आहे. अर्धवट रस्ता लवकर डांबरीकरण करावा, अन्यथा आंदोलन छेडू.
– सुरेश सावंत, ग्रा. पं. माजी अध्यक्ष









