दोघांसाठी कमावते इंफ्लुएंसर
तंत्रज्ञानाची धास्ती जगाला नवी नाही. परंतु मागील काही वर्षांपासून तंत्रज्ञान माणसांपेक्षा वरचढ ठरण्याचा धोका वाढत चालला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स केवळ चॅटजीपीटी आणि रोबोटच्या ‘जगावरील कब्जा’पुरते नाही. याचे उदाहरण एका जागरुक दांपत्याने दिले आहे. त्यांनी एक पूर्णपणे नकली सोशल मीडिया मॉडेल निर्माण केल्यावर स्वत:ची नोकरी सोडून दिली आहे. ही सोशल मीडिया मॉडेलच आता त्यांना कमावून देत आहे.
ओलिविया सी एक अत्यंत यथार्थवादी प्रभावशाली व्यक्ती असून जिला पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करत निर्माण करण्यात आले आहे. तिचे इन्स्टाग्राम एका उत्साही प्रवाशाचे जीवन दर्शविते, जी पोर्तुगाल, पेरू आणि युकेसमवेत जगभरातील देशांमध्ये सहज दिसून येणारी छायाचित्रे तयार करते.
ओलिविया सी हिला जिवंत करण्यासाठी एक जोडपे अथक प्रयत्न करत आहे. 42 वर्षीय अल्वेरो आणि 34 वर्षीय रिता यांनी जाहिरात उद्योगात 20 वर्षे काम केल्यावर आता रचनात्मक एजेन्सी फलामुसा स्थापन केली आहे. एआयविषयी लोक कल्पना करत आहेत की ते आम्हाला आणि जगाला नष्ट करतील. प्रत्यक्षात गोष्टी खूपच पुढे जात असून हे अत्यंत प्रेरक आहे. आम्ही या तंत्रज्ञानाद्वारे उपयुक्त अॅप्लिकेशन्सचा शोध घेत आहोत असे त्यांनी सांगितले आहे.
अल्वेरो हे ओलिविया सीच्या मार्केटिंगवर अधिक काम करतात. तर रीता लुमा एआय आणि मिडजर्नी यासारख्या अनेक नव्या तंत्रज्ञानांचा वापर करून तिच्या उपस्थितीला एकत्र आणते. ओलिविया सीच्या जिवंत सोशल मीडिया छायाचित्रांमुळे तिला या वर्षाच्या प्रारंभी आयोजित जगातील पहिल्या एआय जनरेटेड ब्यूटी पेजेंटमध्ये तिसरे स्थान मिळाले.
टेक ऑस्करच्या रुपात ओळखल्या जाणाऱ्या या ऑनलाइन सोहळ्यात पूर्णपणे नकली मॉडेलला तिची उपस्थिती, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या प्रभावाच्या आधारावर निवडण्यात आले आहे. अल्वेरो आणि रीता हे ओलिविया सी हिला स्वत:च्या मुलीप्रमाणे मानतात.