प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील हुतात्मा चौकाच्या दुरुस्तीसह सुशोभिकरणाच्या कामाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती हे बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष असून ते आपल्या प्रभागातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हुतात्मा चौकाच्या दुरुस्तीसह सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात यावे, यासाठी त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार कामासाठी निधी उपलब्ध झाला असल्याने शुक्रवारी हुतात्मा स्मारकाच्या सभोवताली काँक्रिट घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









