सुब्रमण्य स्वामी मंदिराचा समावेश
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या थूथुकुडी जिल्हय़ातील तिरुचेंदूरमधील श्री सुब्रमण्य स्वामी मंदिर परिसराचे 171 कोटी रुपये खर्चुन मोठय़ा प्रमाणावर सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने चालूवर्षात 2500 हून अधिक मंदिरांची नुतनीकरण, जीर्णोद्धार आणि देखभाल योजनांसाठी निवड केली आहे. या योजनांसाठी 365 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आली आहे. तर देणगीदारांच्या योगदानातून उद्याननिर्मिती, प्रकाशव्यवस्था, परिसराच्या भिंतींची दुरुस्ती इत्यादी कामे केली जाणार आहेत. तिरुचेंदूर किनारी विनियमन क्षेत्रात मंदिर येत असल्याने राज्य सरकारने केंद्राकडे पर्यावरणीय मंजुरी मागितली असल्याची माहिती हिंदू धार्मिक आणि धर्मार्थ व्यवस्थापन विभागाचे आयुक्त जे. कुमारगुरुवरन यांनी दिली









