मनसे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट
संगमेश्वर प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकल्याचा राग येऊन पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी 6 जणांविरुध्द गुन्हा दाख करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण (कडवई), अनुराग महेंद्र कोचिरकर (देवरुख), शेखर बाळकृष्ण नलावडे (देवरुख), सनी श्रीकांत प्रसादे (देवरुख) व सलमान अल्लीहुसेन बोदले आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणारे विवेक चव्हाण यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- रांगव- धनगरवाडीत गोठ्यात सापडली बिबट्याची पिल्ले; एकाचा मृत्यू
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मनाई आदेश असताना जितेंद्र चव्हाण, अनुराग कोचिरकर, शेखर नलावडे, सनी श्रीकांत प्रसादे व सलमान बोदले यांनी बेकायदेशिर जमाव करुन साई मेडीकलमध्ये प्रवेश करून शिवीगाळी व दमदाटी करून दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग होण्याच्या दृष्टिने दंगा केल्याने फिर्यादीत म्हटले आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात सहा जणांवर भा.द.वि.क. 143, 145, 147, 149, 452, 504, 506 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चेकलम 37 (1) (3) , 110 / 117 112 / 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किशोर महादेव जोयशी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस शिंदे करत आहेत.