जतच्या कुलाळवाडी येथील घटना
जत/प्रतिनिधी
जत तालुक्यातील कुलाळवाडी येथे आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दोघांना डोक्यात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झाले आहेत. राजू मनगा टेंगले (वय ३०) भाऊसाहेब ज्योतिबा लोखंडे हे दोघे जावई व सासरे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद राजू टेंगले यांनी उमदी पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी गंभीर जखमी केल्याप्रकरणी भीमा अण्णाप्पा तांबे, एकनाथ आण्णाप्पा तांबे, अण्णाप्पा तांबे (सर्व रा. कुलाळवाडी) या तिघांवरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास व सायंकाळी ५ वाजता घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुलाळवाडी येथे भाऊसाहेब लोखंडे व राजू टेंगले या दोघांचे भीमा तांबे, एकनाथ तांबे यांच्याशी आर्थिक देवाणचे व्यवहार होते. हे व्यवहार का पूर्ण केले नाहीत म्हणून राजू टेंगले यांच्या डोक्यात दांडक्याने जोरदार मारहाण केल्याने गंभीर जखमी झाले आहेत. तसेच भाऊसाहेब लोखंडे यांनाही लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली आहे. त्यांच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी भीमा तांबे, एकनाथ तांबे, अण्णाप्पा तांबे या तिघांवर गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात करत आहेत.








