दोडामार्ग (वार्ताहर)
दोडामार्ग शहरात अस्वलाचा वावर दिसून आला आहे. शहरातील खालची धाटवाडी _ धनगरवाडी परिसरात हे अस्वल दिसून आले असून तेथील रहिवासी असलेल्या वैभव उल्हास गवस यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अस्वलाचा वावर कैद झाल्याची माहिती श्री .गवस यांनी दिली. दोडामार्ग शहरातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या मोठ्या कालव्या नजीक वैभव गवस यांचे घर आहे . या घर परिसरात त्यांची फळ शेती बागायती आहे. त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेरा मध्ये गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास एक अस्वल झाले. काल शनिवारी सहजपणे सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना त्यांना ही बाब निदर्शनास आली. दरम्यान शहरात अस्वल दिसण्याचा हा पहिलाच प्रकार असून त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.









