जिल्हाधिकाऱयांनी केल्या अधिकाऱयांना सूचना : तालुक्मयातील तहसीलदारांनी आराखडा तयार करावा
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या काही वर्षांमध्ये मान्सूनच्या पहिल्या पावसानेच पुराची परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक ठिकाणी महापूर येऊन मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्मयता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी नैसर्गिक आपत्ती निवारण समितीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हय़ातील अधिकाऱयांना पाऊस आणि कोरोनाबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे दरवषीच नुकसान होत आहे. मान्सून सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रामधून कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात पाणी विसर्ग केले जाते. त्याचा फटका कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नदीकाठांवरील गावांना बसत आहे. तेव्हा आतापासूनच त्याची तयारी करावी. ज्या ठिकाणी बोटीची व्यवस्था करायची आहे त्या ठिकाणी तातडीने ती व्यवस्था करावी. धोकादायक विद्युत खांब हटवावेत, विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्मयता आहे. त्यासाठी आतापासूनच औषधांचा साठा तसेच इतर सुविधा उपलब्ध करण्याची तयारी आरोग्य विभागाने करावी, असेदेखील त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्मयातील तहसीलदारांनी आराखडा तयार करावा. कोरोना तसेच पुरापासून कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नदी परिसरात असलेल्या गावांना पूर येत आहे. ज्या गावांना पूर येतो त्या ठिकाणी तहसीलदारांनी अधिक लक्ष द्यावे, ग्रामपंचायत पीडीओंनी देखील आतापासूनच सतर्कता बाळगावी, असे त्यांनी सांगितले. कृषी विभाग, आरोग्य विभाग, हेस्कॉम, पोलीस, गृहरक्षक दल यांच्याशी संपर्क साधून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सूचना करण्यात आली आहे.
आपत्ती निवारण करण्याबाबत कंट्रोल रुमची स्थापना करावी. पूर परिस्थितीत स्थलांतरित नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधाचा साठा करून ठेवावा, साप किंवा इतर कोणत्याही विषारी प्राण्याने दंश केल्यानंतर तातडीने उपचार करण्यासाठी सर्व लस उपलब्ध करून ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले. मनुष्यहानी, प्राणहानी झाल्यास तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले. बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक चन्नबसाप्पा कोडली, आरोग्याधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.









