मद्रास आय नावाच्या डोळ्यांचा आजार आता पसरू लागला आहे.
सध्या सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. यातच आता अचानक डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी वाहणे, पु येणे, ताप येणे या प्रकारे लक्षणे दिसून येत असतील तर ही मद्रास आय आजाराची लक्षणे समजावित. पावसाळ्यात हा आजार बळावतो. मात्र हा आजार संसर्ज नसून याला घाबरण्याची गरज नाही. परंतु हि लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे हितकारक ठरेल. असे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी तालुका गट शिक्षणाधिकाऱ्यां सोबत मद्रास आय संदर्भात जन जागृती करण्या संबंधी पत्र लिहिले आहे. हळू हळू आता सगळीकडे मद्रास आय ची लागण झाल्याचे वृत समोर येत असून, जनतेनी यापासून सुरक्षित राहण्यासाठी स्वतः कडे सदैव रुमाल बाळगावा, रुग्णाचे अंथरूण, कपडे, टॉवेल नेहमी स्वच्छ ठेवावेत. नेहमी गरम पाण्याने हात पाय धुवावे, गरम पाण्यानी नियमित आंघोळ करावी. वैद्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे. मद्रास आय ची लागण झालेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. ज्यांना अशा प्रकारची लक्षणे जाणवत असतील त्यांनी त्वरित तज्ञ डॉक्टराकडून आपले उपचार करून घ्यावेत असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी केले आहे.









