आरजीला उघडे पाडण्यास वेळ लागणार नाही : विकास भगतचा यांचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हादईच्या विषयावर राजकारण करून गोवा फॉरवर्ड पक्ष किंवा विजय सरदेसाई यांच्यावर टीका केल्या खबरदार असा इशारा गोवा फॉवरर्डचे विकास भगत यांनी दिला आहे. इतके दिवस मनोज परब यांच्या पोकळ वल्गना लोकांनी ऐकल्या आता ते जमणार नाही. मनोज परब काय आहे ते दाखवयाला किंवा त्यांचा भांडाफोड करण्यास आम्हालाही वेळ लागणार नाही. असेही भगत यांनी सांगितले.
काल पणजीतील गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परीषदेत विकास भगत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत फेड्री त्रासावो तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. आरजीचे मनोज परब म्हादईच्या विषयावरून राजकारण करीत आहेत. केवळ विरेधकांवर टीका करीत आहेत. सत्ताधारी पक्षांशी लागेबंध ठेवून आणि लोकांना मुर्ख बनवून आपली पोळी भाजत आहे. गोवा फॉरवर्ड कालही म्हादई वाचविण्यासाठी काम करीत होता आणि आजही तेच करीत आहे. म्हादईच्या विषयावर लढा देण्यासाठी आज गोवा फॉरवर्ड लोकांना एकत्र करण्यासाठी दिवस रात्र काम करीत आहे. कारण म्हादई वाचविण्यासाठी एकला चलोने काम होणार नाही तर त्याला गोमंतकीयांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. असेही विकास भगत यांनी सांगितले.
म्हादईसाठी लाकांनी एकत्र यावे म्हणून विविध बिगर सरकारी संस्थाच्या सभा घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडला जात आहे. 25 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या सभेत अनेकांनी म्हादईसाठी एकत्र येण्याचे आश्वासन गोवा फॉरर्वड पक्षाला दिले आहे. म्हादईच्या विषयावरून गोवा फॉरवर्ड राजकारण करीत नाही तर निस्वार्थीपणाने म्हादई वाचविण्यासाठी कार्य करीत आहे. म्हादई हा संपूर्ण गोमंतकीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. 16 जानेवारी रोजी याबाबत साखळी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. असेही विकास भगत यांनी सांगितले.
आरजीचे मनोज परब हे केवळ विरोधकांवर टीका करीत आहे त्यांनी म्हादई वाचविण्यासाठी कोणती उपाय योजना आखली आहे. म्हादईचा विषय घेऊन आत्तापर्यंत कीती एनजीओनां ते भेटले आहेत ते सांगावे. आरजीला कुणाची गरज नाही आरजी एकला चलो मार्ग अवलंबणार असे सांगत आहे. एका पक्षाचे हे काम नसून समस्थ गोमंतकीयांनी एकत्र येऊन हा लढा देणे काळाची गरज आहे. केवळ सभा घेतल्या आणि भलत्याच विषयावर आरडा ओरड करून पोरकटपणा केला म्हणजे म्हादई वाचवू शकणार नाही. मनोज परब हे लोकांमध्ये फुट पाडून केवळ लोकांना मुर्ख बनवू शकतात आणि त्यात आपली पोळी भाजू शकतात अशी टीकाही विकास भगत यांनी केली.
भाजपाने गोव्याची म्हादई विकली हे सर्वाना माहीत आहे. त्यामुळे आज समस्थ गोमंतकीय भाजपाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यासाठी सर्वानी एकत्र येणे महत्वाचे आहे. राज्यातील विधान सभा निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांनीच मनोज परब महाराष्ट्रात जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. त्यांचे ओएसडी चिवटे यांना भेटतात. आणि जाहिर करतात की आरजी विल गेम चेंजर याचा अर्थ काय तेच कळत नाही. कारण एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. भाजप सोबत राहून कसली गेम चेंज करणार असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे.
गोव्यात राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. म्हाद हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भवी पीठीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे मनोजपरब यांनी लोकांत फुट पाडून म्हादईच्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास गोवा फॉरवर्ड गप्प बसणार नाही. आजी किंवा मनोज परब यांना पैसे कुठून येतात, त्यांच्या हालचाली काय असतात याची सर्व माहिती आरजीकडे आहे. मनोज परब यांना उगडे पाडायला गोवा फॉरवर्डला वेळ लागणार नाही हेही त्यांनी ध्यानात ठेवावे असा इशारा भगत यांनी दिला आहे.









