जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार शशिकला जोल्ले यांचे आवाहन
महेश शिंपुकडे/ निपाणी
गेल्या चार दिवसात परिसरात पावसाचा जोर वाढला आहे समाधानकारक पाऊस पडत असल्याने पाण्याची चिंता मिटू लागली आहे पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम आहे महाराष्ट्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे परिणामी परिसरातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि पाण्याचा विसर्ग वाढवला गेल्यास महापुराची शक्यता व्यक्त होत आहे यासाठी नदीकाठ परिसरात त्याचबरोबर शेतशिवारात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे प्रशासन वाढणाऱ्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून असून जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे यासाठी खबरदारी घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील व आमदार शशिकला जोल्ले यांनी केले.









