बेळगाव : अल्पवयीन बालकांकडून न कळतपणे झालेल्या चुकांचे वृत्तांकन करताना प्रसार माध्यमांनी कायद्याचे पालन केले पाहिजे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांवर मर्यादा ठेवावी लागणार आहे. अन्यथा कायद्यानुसार दंड, शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पवयीनांच्या बाबतीतील चुकांचे वृत्तांकन करताना कायद्याचे भान ठेवावे लागणार आहे. बालवयामध्ये अल्पवयीनांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या चुका होतात. याबाबत वृत्तांकन करताना वृत्तपत्र माध्यमांनी बाल अपराधी असा उल्लेख न करता कायद्यात्मक संघर्ष असलेला बालक अशी नोंद करावी लागणार आहे. तसेच अल्पवयीनांकडून झालेल्या चुकांची सुधारणा करण्यासाठी त्यांच्यात मानसिक बदल घडवून आणण्याबरोबरच त्यांचे पालनपोषण करण्याकरिता बाल न्याय मंडळाकडून त्याची चौकशी केली जाते. यावेळी त्याला दाखल करण्यात येणाऱ्या केंद्राला रिमांड होम असे न म्हणता ऑब्झर्वेशन होम (निरीक्षण घर) असे संबोधावे. लैंगिक हल्ला प्रकरणातील अल्पवयीनांना लैंगिक अत्याचार असे न संबोधता लैंगिक हल्ला, हिंसा, शोषण असे शब्द वापरण्यात यावेत. अल्पवयीनांच्या प्रकरणासंदर्भात चूक केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास मुलाचे छायाचित्र, नाव, पत्ता, गाव, शाळा, कुटुंब अथवा त्याची ओळख पटवून देणारी कोणतीच माहिती प्रसिद्ध करण्यात येवू नये. संकटात सापडलेल्या, शोषण होणाऱ्या अथवा सुरक्षेची गरज असणाऱ्या मुलांचे छायाचित्र, नाव, गाव, शाळा, कुटुंब याची कोणतीच माहिती प्रसिद्ध करण्यात येवू नये. लैंगिक हल्ला प्रकरणासंदर्भातही हेच नियम पाळावे लागणार आहेत. 18 वर्षाखालील मुलांचे कोणत्याच प्रकारची अश्लिल चित्रे, व्हिडिओ कोणत्याच स्वरुपात संग्रहीत करण्यात येवू नयेत. हा देखील गुन्हा ठरू शकतो. यासाठी वृत्तपत्र माध्यमांनी अशा प्रकारच्या घटनांचे वृत्तांकन करताना कायद्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे कळविले आहे. याचे उल्लंघन झाल्यास शिक्षेची तरतूद केली आहे.
Previous Articleमोती तलावात कोसळलेल्या अल्पवयीन युवतीची ओळख पटली
Next Article शहर परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









