इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दुर्गम गावांना सुरक्षेबाबत दिल्या सुचना
आचरा प्रतिनिधी
इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरापासून जवळ असलेल्या,दुर्गम गावांना आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी भेट देवून सुरक्षेबाबत कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात या बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.आचरा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगर पायथ्याशी तसेच डोंगरा पासून जवळ असणाऱ्या कुडोपी, बुधवळे, मठ बुद्रूक, किर्लोस, चिंदर व शिरवंडे या गावांना त्यांनी भेटी दिल्या. सदर गावातील रहिवाश्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत भुस्खलन, नैसर्गिक आपत्ती दरम्यान प्राथमिक दृष्टया करावाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांना लोकल प्रत्येक वाडी प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन ग्रुप तयार करण्यास तसेच एखाद्या धोक्याचा इशारा समजण्याकरिता वाडीमध्ये मध्यभागी स्पीकर लावण्यास संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
रायगड सारखी दुर्घटना होऊ नये म्हणून वरील भुस्खलन धोकादायक गावांची नावे महसूल विभागास धोकादायक गावांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यास तसेच काही वाड्यांमध्ये आधुनिक साधन सामुग्रीने बचाव कार्य करता येईल याबाबत उपययोजना करणेसंदर्भात पत्रव्यवहार केला असल्याचे व्हटकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारी अक्षय धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.









