वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची सर्वसाधारण वार्षिक खास बैठक 1 मार्च रोजी मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये बीसीसीआयच्या नव्या संयुक्त सचिवाची नियुक्ती केली जाणार आहे. ..बीसीसीआयच्या संयुक्त सचिवपदी यापूर्वी देवजित सायकीया यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण सायकीया यांना त्यांच्या पदावरुन हटविल्याने हे पद रिक्त झाले होते. 1 मार्चच्या बैठकीला विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.









