वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
26 जुलैपासून सुरु होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय अॅथलेटिक्स पथकाला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआयने) 8.5 कोटी रु. आर्थिक मदत जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली आहे.
या स्पर्धेत भारतीय खेळाडू निश्चितच दर्जेदार कामगिरी करतील अशी आशा शहा यांनी व्यक्त केली आहे. भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला बीसीसीआयचा संपूर्ण पाठिंबा राहिल, असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये एकूण 257 सदस्यांचे भारतीय पथक सहभगी होणार असून त्यामध्ये 117 अॅथलिटस् व 140 प्रशिक्षक वर्गातील सदस्यांचा समावेश आहे.









