ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱया खेळाडूंचे मानधन वाढविण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 40 हून अधिक सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंचे मानधन 60 हजार रुपये, 23 वर्षांखालील खेळाडूंचे मानधन 25 हजार तर 19 वर्षाखालील क्रिकेटपटूंचे मानधन 20 हजार रुपये असणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, 2019-20 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणाऱया क्रिकेटपटूंना करोना व्हायरसमुळे सामने खेळता आले नाहीत. या खेळाडूंना 2020-21 मध्ये स्थगित झालेल्या नुकसान भरपाईपोटी 50 टक्के अतिरिक्त मानधन देण्यात येणार आहे.









