वार्ताहर /पणजी
गोमंतक मराठा समाज संस्थेच्या 97 वा वर्धापनदिन सोहळय़ाचा योग साधून संस्थेच्या केंद्रीय महिला समितीतर्फे प्रथमच 8 मे रोजी येथील राजाराम पैंगीणकर सभागृहात( गोमंतक मराठा समाज,दयानंद स्मृती इमारत) बाजार डे भरविण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत समितीच्या अध्यक्षा शुभदा कळंगुटकर,समन्वयक रंजिता वाघूर्मेकर यांनी उत्कर्षा बाणास्तरकर व मिलन कामुलकर यांच्या उपस्थिती
त्याविषयी माहिती दिली. शुभदा कळंगुटकर म्हणाल्या, आमच्या महिलांच्या अंगी अनेक कला असतात परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नाही. आत्मनिर्भर भारत या धर्तीवर आम्हाला महिलांना आत्मनिर्भर बनवायचे आहे म्हणून हा
खटाटोप आहे. रंजिता वाघूर्मेकर यांनी सांगितले, की बाजार डे मध्ये 27 स्टॉल असतील त्यात विविध प्रकारचे कपडे, घरगुती वेगवेगळय़ा खाद्यपदार्थांच्या सात स्टॉलचा त्यात समावेश असेल.
वर्धापनदिन सोहळा
गोमंतक मराठा समाजाचा 97 व्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी 8 वा. सत्यनारायण महापूजा,9 वा. सुगमसंगीत,10 वा.’मी कोण’ या स्व. राजाराम पैंगीणकर यांच्या तिसऱया आवृत्तीचे प्रकाशन व पारितोषिक वितरण होईल. या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा विद्यापीठातील शास्त्रज्ञ तथा लेखक आणि विचारवंत डॉ.नंदकुमार कामत,खास निमंत्रित म्हणून गोमंतक मराठा समाज मुंबई संस्थेचे अध्यक्ष उमेश नाईक, विशेष पाहुण्या समाजसेविका कमलिनी पैंगीणकर उपस्थित राहतील. शिक्षणतज्ञ प्रा. उदय बाळळीकर अध्यक्षस्थान भूषवतील.









