वृत्तसंस्था / मियामी गार्डन्स (अमेरिका)
फिफाच्या क्लब स्तरीय विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिच संघाने बोका ज्युनियर्सचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश मिळविला. या विजयामुळे अ गटात जर्मनीच्या चॅम्पियन बायर्न म्युनिचने या प्राथमिक फेरीत दोन सामने जिंकून बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. त्यांचा अद्याप एक सामना बाकी आहे.
बायर्न म्युनिच आणि बोका ज्युनियर्स यांच्यातील हा सामना अटितटीचा झाला. सामन्यातील 18 व्या मिनिटाला हॅरी केनने बायर्न म्युनिचचे खाते उघडले. बोका ज्युनियर्सला मेरिनटेलने शानदार गोल नोंदवून बरोबरी साधून दिली. ओलिसीने बायर्न म्युनिचचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदवून बोका ज्युनियर्सचे आव्हान संपुष्टात आणले.









