बावडा रेस्क्यू फोर्स आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका गऱीब महिलेचा व तिच्या बाळाचा जीव वाचला आहे. गरिबीमुळे आणि कुटुंबातील कलहामुळे अत्यंत टोकाची भुमिका घेणाऱ्या महिलेला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यात यश मिऴवले आहे. रेस्क्यु टिमच्या या प्रयत्नाचे नागरिकांकडून कौतूक होत आहे.
याबाबत मिळालली माहीती अशी; काल शनिवारी रात्री साडेबारा वाजता अत्यंत गरीब कुटुंबातील मजूर महिला आपल्या दीड ते दोन वर्षाच्या लहान मुलाला कडेवर घेऊन पंचगंगा नदीपात्राच्या राजाराम बंधाऱ्याकडे चिंताग्रस्त अवस्थेमध्ये ओक्साबोक्शी रडत चालली होती. बावडा रेस्क्यू फोर्सचे राकेश हराळे यांच्या ती निदर्शनास आल्यावर त्यांना शंका आली. त्यांनी त्या महिलेला नदीच्या काठावरच अडवून ताबडतोब बावडा रेस्क्यू फोर्सचे निशिकांत कांबळे यांना फोन केला.
निशिकांत व त्यांचे मित्र सुनील इंदुलकर, संदीप हुजरे, विकास वेटाळे, निरंजन कोलेकर, अनिकेत अस्वले, भोला सुतार, अनिल यादव हे सर्वजण ताबडतोब पोहचले. त्या महिलेची विचारपूस करून तिला विश्वासात घेतले. आपल्या आईला कवटाळून बसलेल्या किलबिलतत्या नजरेने इकडे- तिकडे भिरभिरत्या नजरेने पाहणाऱ्या निरागस बाळाला व त्याच्या आईला नदिपात्रापासून दूर आणून त्यांना धीर दिला…प्यायला पाणी दिले…त्यांच्या नातेवाईकांना फोन करून बोलवून घेतले. त्या सर्वांची समजूत काढली व त्यांना या अत्यंत कटू प्रसंगातून वाचवले. बावडा रेस्क्यु पोर्सच्या या पुढाकाराने आज एक फार मोठी दुर्दैवी घटना टळली…..व दोन निष्पाप जीवांचे प्राण वाचवले…रेस्क्यु फोर्सच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले आहे.









