वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचा कर्णधार टेम्बा बवुमाला दुखापत झाली असल्याने बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. डाव्या हाताचे स्नायू दुखावल्याने हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगण्यात आले.
त्याच्या गैरहजेरीत एडन मार्करम या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल. बवुमा जखमी असला तरी तो संघासोबत ढाक्याला प्रयाण करणार आहे. संघाच्या मेडिकलच्या देखरेखीखाली त्याच्या सुधारणेवर लक्ष ठेवण्यात येईल, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने निवेदन दिले आहे. याआधी बवुमा तिसऱ्या वनडे सामन्यातही जखमी असल्याने खेळू शकला नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेश-द.आफ्रिका यांच्यात दोन कसोटी होणार असून 21 ऑक्टोबरला पहिली कसोटी ढाक्यातील शेर ए बांगला स्टेडियमवर होईल तर दुसरी 29 ऑक्टोबरपासून चितगाव येथे सुरू होईल.









