वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
चालु महिन्याच्या अखेरीस भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या द.आफ्रिका अ संघामध्ये टेंबा बवूमाचा समावेश करण्यात आला आहे. बवूमा हा दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचा नियमीत कर्णधार आहे.
भारताच्या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका अ संघ भारत अ संघाबरोबर तीन वनडे सामने खेळणार आहे. तसेच 14 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित केली आहे. द.आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. द.आफ्रिकेचा हा भारत दौरा 19 डिसेंबरला संपणार आहे. त्याच प्रमाणे बेंगळूरमध्ये होणाऱ्या दोन प्रथमश्रेणी सामन्यांतील दुसऱ्या सामन्यात बवूमा खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. द.आफ्रिका अ संघाचे नेतृत्व मार्क्वेस अॅकरमन करीत आहे. या संघात हमझा, सुब्dर्रायन यांचा समावेश आहे.









