कोल्हापूर / सुधाकर काशीद :
युद्ध म्हणजे सैनिकाकडे बंदूक, संगीन, दारुगोळा, दुर्बीण, वॉकीटॉकी हे असतेच, पण युद्धाच्या काळात सैनिकाकडे सायकल आणि तीही पाठीवर बांधलेली म्हणजे काहीसे विसंगत वाटते. युद्धात त्या त्या परिस्थितीत सैनिकांना दळणवळणासाठी सायकलही वापरावी लागते, आणि त्या क्षणाला त्या ठिकाणी सायकलच उपयोग पडते, आज जागतिक पातळीवर ‘सायकल दिवस आहे. आता सायकल ही गरजेबरोबर व्यायामासाठीही आवश्यक झाली आहे. पण देशाच्या संरक्षणातही खारीचा वाटा उचलून आपले महत्त्व अधोरेखित केले आहे.
कोल्हापुरातील रवी घाटगे व प्रवीण घाटगे या बंधूनी अशी सैन्य दलातील एक जुनी सायकल मिळवली आहे. आणि त्या सायकलचे जतन केले आहे. आता युद्ध शास्त्रात कितीही आधुनिकता आली असली तरी सायकल ती सायकलच असे म्हणत त्यांनी या सायकलला आपल्या दिवानखान्यात मानाचे स्थान दिले आह. त्यांच्याकडे असलेली ही मिलिटरी सायकल १९४२ सालची आहे. सायकलीचा रंग अर्थातच मिलिटरी ग्रीन आहे ही सायकल इतर सायकली पेक्षा थोडी लहान आहे. ही सायकल गरज असेल तेव्हा वापरता येते. गरज नसेल त्यावेळी फोल्ड करता येते. सायकलीसाठी वापरले गेलेले लोखंड लहान आकाराचे. पण एक माणूस सायकल वर बसला तरी तो व्यवस्थित जाऊ शकेल अशी आहे. युद्धात जेथे मार्गच नाही अशाच ठिकाणी अशा सायकलींचा वापर आहे या सायकलीचे वजन खूप कमी आहे. व ती फोल्ड केल्यावर पुढचे व मागचे चा क एकमेकांवर येते. ही सायकल पाठीवर सॅक सारखी घेता येते. सैनिक ही सायकल पाठीवर बांधून पॅराशूटमधून ही उडी मारू शकतो. एका हाताने सायकल सहज उचलू शकतो.
अर्थात ती सायकल म्हणजे अगदी विरळ परिसरात सैनिकांना मोठा आधार म्हणून वापरली गेली आहे.
- सायकल जपणार…
युद्धात आधुनिक शस्त्रांचा साधनांचा वापर वाढला आहे. आणि तो वाढतच जाणार आहे. पण सायकलने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उचललेला खारीचा वाटा आपण विसरून जाऊ नये या भावनेने आम्ही ती सायकल जपली आहे. पुढेही जपणार आहे. १९४२ सालच्या या सायकलीला अजूनही कोठे गंज चढलेला नाही.
– रवी घाटगे प्रवीण घाटगे सायकलीचे संग्राहक
या सायकलीचे वैशिष्ट्य म्हणजे सायकलवर एक सैनिक बसू शकतो. आणि दुर्बीण, छोटा स्टोव्ह, पाण्याची बाटली, वॉकी टॉकी आणि पाठीवरची सॅक यासोबत निश्चित प्रवास करू शकतो. आणि दुसया महायुद्धात या सायकलींचा वापर त्या त्या क्षणी असाच झाला आहे. आता युद्धशास्त्रात सर्व काही आधुनिक आले आहे. सायकल वापरली जाईल की नाही ही शंका आहे. पण लष्करी युद्ध साधनात आजही सायकलीला मान आहे. तीन जूनला सायकल दिन आहेत्यामुळे वैयक्तिक वापर म्हणून नव्हे तर, युद्धासारख्या प्रसंगातही सायकल कशी मदतीला आली याची आठवण पुन्हा ताजी करणारी आहे.








