वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना बॅट, पॅड आणि इतर क्रिकेट उपकरणे गमावून बसावे लागले असून ते बेंगळूरहून दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या सामानातून हे साहित्य चोरीस जाण्याचा प्रकार घडला. सूत्रांनी सांगितल्यानुसार, एका दिवसानंतर खेळाडूंना त्याबद्दल कळले. कारण एका दिवसानंतर कार्गोमधून किट बॅग आल्या.
जवळजवळ सर्व खेळाडूंनी त्यांच्या बॅट गमावल्या आहेत. यश धुलने त्याच्या किमान पाच बॅट गमावल्या आहेत. परदेशी खेळाडूंनी गमावलेल्या बॅटची किंमत प्रत्येकी 1 लाख ऊ. आहे. हे प्रकरण कसे हाताळावे आणि पोलिसांची मदत कशी घ्यावी यावर ‘दिल्ली कॅपिटल्स’ विचार करत आहे.









