पसंतीच्या भाज्यांमध्ये अत्यंत कमी लोकांनाच भोपळा आवडत असावा. बहुतांश लोक भोपळ्याचे नाव ऐकताच तेंड फिरवितात. परंतु काही लोकांना भोपळा अत्यंत आवडतो. एकेठिकाणी भोपळ्याची लोकप्रियता प्रचंड असल्याने लोकांच्या ताटासोबत बाथटबमध्ये देखील त्याचा वापर केला जात आहे.
ब्रिटनमध्ये एक महिन्यासाठी बेर मंथ सुरू आहे. येथे लोक केवळ आणि केवळ भोपळ्यासाठी वेडावलेले असतात. भोपळ्याचा रस पिणे, त्याचाच स्पा घेणे आणि त्याच्याद्वारे फेशियल अन् मसाज देखील केला जातो. दरवर्षी होणारा हा पंपकिन स्पाइस स्पा डे यंदाही जोरदारपणे आयोजित होत आहे.

हे जगातील अशाप्रकारचे पहिलेच आयोजन असून यात लोक भोपळा अन् मसाल्यांचा वापर करून स्पाचा आनंद घेत असतात. यादरम्यान एका हॉट टबला भोपळ्याचा पल्प आणि मसाल्यांद्वारे तयार ड्रिंकद्वारे भरले जाते. येथे विशेष भोपळायुक्त फेशियल अणि भोपळ्याद्वारे मसाज केला जातो. सर्व प्रक्रियेत भोपळ्याच्या पल्पसोबत दालचिनी, जायफळ, लवंग आणि कॉफी यासारख्या गोष्टींचा वापर केला जातो. या खास प्रक्रियेत लोकांना उबदार आराम देणाऱ्या भोपळ्याच्या पेस्ट अन् मसाल्यात स्पा करायचा असतो, जो कॉफीच्या गुणांनी भरपूर असतो.
भोपळ्यामध्ये अनेक गुणधर्म असतात, त्यावर व्हिटॅमिन अन् अँटीऑक्सिडेंट्सचा समावेश केला जात असल्याने लोकांच्या त्वचेला याचा लाभ होतो. भोपळा अन् मसाल्याचे मिश्रण एखाद्या जादूप्रमाणे काम करत असल्याचे या सोहळ्यात भाग घेणाऱ्या लोकांचे सांगणे आहे.









