प्रतिनिधी / बेळगाव : बसुर्ते ते कोवाड रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. त्या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात येणार होता. मात्र पोलीसांनी रास्तारोको करू नका अशी विनंती केली. हवेतर जिल्हाधिकार्यांना निवेदन द्या असे त्यांनी सांगितले. त्यामुळे बसुर्ते, बेकिनकेरे परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून रस्त्याच्या दुरूस्तीाची मागणी केली आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा बसुर्ते ते कोवाडपर्यंतचा रस्ता आहे. मात्र या रस्त्याकडे कर्नाटक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. हा रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी वारंवार करण्यात आली. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामधून वाहने चालविणे कठिण झाले आहे. या समस्येविरोधात सोमवारी रास्ता रोको करण्यात येणार होता. मात्र पोलीसांनी रास्ता रोको करू नका अशी विनंती केली आहे.
त्यानंतर बांधकाम संघटनेच्या माध्यमातूून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर निवेदन देण्यात आले. तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करा अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सुनिल गावडे, अनिल शिंदे, बांधकाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. एन. आर. लातूूर, दर्याप्पा बिळगी, अॅड. रोहित लातूर, शितल बेलावर यांच्यासह कामगार उपस्थित होते.









