रशियात सुरू आहेत उपचार
वृत्तसंस्था/ मॉस्को
सीरियाच्या सत्तेवरून हटविण्यात आलेले बसर अल असाद हे स्वत:च्या परिवारासोबत रशियात आश्रयास आले आहेत. तर असाद यांची पत्नी अस्मा या ल्यूकेमियाने ग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. संक्रमणाची जोखिम कमी करण्यासाठी त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 49 वर्षीय अस्मा यांना तीव्र माइलॉइड ल्यूकेमिया झाल्याचे निदान मे महिन्यातच झाले हेते.
अस्मा या ब्रिटिश नागरिक असून त्या पुढील उपचार ब्रिटनमध्ये करवून घेऊ इच्छित आहेत. अस्मा यांच्या विरोधात निर्बंध लागू असल्याने त्या ब्रिटनमध्ये दाखल होऊ शकत नाहीत. अस्मा असाद यांना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे ब्रिटनचे विदेश मंत्री डेविड लॅमी यांनी संसदेला संबोधित करताना सांगितले आहे. डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी सीरियातील बंडखोर संघटना हयात तहरीर अल-शामच्या नेतृत्वात अन्य गटांनी सीरियाच्या सत्तेवर कब्जा केला होता. सत्तेवरून हटविण्यात आल्यावर असाद आणि त्यांच्या पत्नीने रशियात आश्रय घेतला होता. अस्मा यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे.









