प्रतिनिधी / म्हापसा
दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जिल्हा आझिलो इस्पितळाच्या बेसमेंटमध्ये सर्व पाणी भरल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले. आझिलो अधीक्षकांनी याबाबतची माहिती स्थानिक नगरसेवकांना दिल्यावर नगरसेवक तारक आरोलकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
त्याठिकाणी इस्पितळाचे सर्व तांत्रिक इलेक्ट्रीक सुविधा बसविल्याने पाणी त्यामध्ये गेल्यास आझिलोत शॉट सर्कीट होऊ शकते याची दखल घेत नगरसेवक आरोलकर यांनी पंप आणून पंपाद्वारे पाणी बाहेर काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.









