कोल्हापूर /प्रतिनिधी
बसवराज नंदगावी याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करू. असं आश्र्वासन खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी दिलं. मयत बसवराज नंदगावी यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सात्वनपर भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
महापुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी गेला अन् नियतीने मदतगारालाच हिरावून नेल्याची घटना शनिवारी गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी या गावात घडली होती. या घटनेत बसवराज चिदानंद नंदगावी या २३ वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता. हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुराचे पाणी हिटणी गावात शिरले आहे. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गल्लीमध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. अशा पूरग्रस्त नागरिकांचे साहित्य बांधून त्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याचे काम काही तरुण करत होते. एका पूर ग्रस्त कुटुंबियांच्या घरातील साहित्य बांधून त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोच करून अंगाला लागलेला चिखल आणि राडीत मळलेली कपडे काढून बसवराज नंदगावी अंघोळीसाठी नदीत गेला होता. याच वेळी तोल जाऊन त्याचा प्रवाहित विद्युत तारांना स्पर्श होवून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनंतर खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी आज, रवीवारी मयत बसवराज नंदगावी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी बसवराज नंदगावी यांच्या आई, वडील आणि दोन भाऊ यांच, सांत्वन करुन त्यांना शासन पातळीवरून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.असं आश्र्वासनही खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी दिलं.यावेळी काँग्रेसचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष प्रशांत देसाई, काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरंबे, डॉक्टर नंदाताई बाभुळकर, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, बसवराज नंदगावी आदी उपस्थित होते.