येळ्ळूर सन्मित्र फौंडेशन आयोजित खो-खो स्पर्धा
वार्ताहर/येळ्ळूर
सन्मित्र फौंडेशन येळ्ळूर आयोजित जिल्हास्तरीय मुला, मुलींच्या खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलांच्या नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरचा तर मुलींच्या गटात नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरने भावकेश्वरी यडोगाचाड पराभव करून विजेतेपद मिळविले. नवहिंद क्रीडा केंद्र मैदान येळ्ळूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. मुलांच्या बारा व मुलींच्या आठ संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत. मुलांच्या बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडी संघाने विजेतेपद तर नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने उपविजेतेपद मिळविले. तृतिय क्रमांक तोपिनकट्टी संघाने मिळवला. मुलींच्या गटात नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने विजेतेपत तर भावकेश्वरीयडोगा संघाने उपविजेतेपद मिळविले. तृतिय क्रमांक अलतगा हायस्कूल आलतगा संघाने पटकाविला.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी फौंडेशनचे संस्थापक वाय. सी. गोरल होते. स्वागत सन्मित्रचे चेअरमन राजकुमार पाटील व प्रास्ताविक फौंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन वेणुग्रामचे सायकलिंग क्लब व उद्योगपती राजू नायक, प्रमुख पाहुणे म्हणून अमित पिंगट यांच्या हस्ते झाले. नवहिंद क्रीडाकेंद्राचे सेक्रेटरी आनंद पाटील यांच्याहस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर एन. डी. पाटील, शिवाजी सायनेकर, हणमंत कुगजी, मोहन पाटील, शिवाजी नांदुरकर, प्रसाद मजुकर, सतीश धामणेकर, रणजीत गोरल, के. एन. कर्लेकर, गोविंद टक्केकर होते.
अतिशय चुरशीने झालेल्या या स्पर्धांमध्ये मुलांच्या गटातील उत्कृष्ठ खेळाडू म्हणून बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडीच्या नंदीश पाटील याची तक्कृष्ठ रनर म्हणून नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरच्या किशोर मालुचे याची आणि उत्कृष्ठ चेंजर म्हणून बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडीच्या विनायक पाटील याची विनड करण्यात आली. मुलींच्या गटात उत्कृष्ठ खेळाडू म्हणून नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरच्या सानिका चिठ्ठी, उत्कृष्ठ रनर म्हणून प्रणाली बिजगरकर यांची तर उत्कृष्ठ चेंजर म्हणून यडोगा संघाच्या अपेक्षा निलजकरची निवड करण्यात आली. बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. शाम पाटील, माजी एपीएमसी सदस्य बेनकनहळ्ळी, उद्योजक संजय बेळगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









