वार्ताहर/उचगाव
तुरमुरी येथील रामलिंग क्रीडा केंद्र व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व युवतींसाठी भव्य खुल्या खो-खो स्पर्धेतील अंतिम सामन्यात बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडीने रामलिंग स्पोर्ट्स क्लब तुरमुरीचा तर मुलींच्या गटात नवहिंद स्पोर्ट्स येळ्ळूरने रामलिंग स्पोर्ट्स क्लब तुरमुरीचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी नागराज जाधव होते. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये मुलांच्या विभागामध्ये 8 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडीने रामलिंग स्पोर्ट्स क्लब तुरमुरीचा पराभव केला. विजेत्या संघाला अकरा हजार ऊपये व चषक, तर उपविजेत्या तुरमुरी संघाला 7001 व चषक देण्यात आला. मुलांच्या विभागात तृतीय स्थान क्रीडाकेंद्र तुरमुरीने पटकाविले. मुलींच्या खो-खो स्पर्धेत एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक नवहिंद स्पोर्ट्स येळ्ळूर, द्वितीय क्रमांक रामलिंग स्पोर्ट्स क्लब तुरमुरी, तृतीय क्रमांक भावकेश्वरी स्पोर्ट्स येडोगा यांनी मिळविला. उपस्थितांचे स्वागत राजू गडकरी यांनी केले.









