वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी (ता बेळगाव )श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवारी प्रारंभी गावातील सर्व देवतांची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीची पहिली पूजा करण्यात आली. यावेळी देवीला गोड नैवेद्य दाखविण्यात आला.
आज अक्षतारोपण
बुधवार दि. 14 रोजी पहाटे गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम होणार असून अक्षतारोपण, देवीचे दर्शन, हक्कदारांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर देवी रथावर विराजमान झाल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होणार आहे. तब्बल 17 वर्षानंतर होणाऱ्या यात्रेची यात्रा कमिटी व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी केलेली आहे. यात्रेनिमित्त मूळचे बसरीकट्टी गावचे व परगावचे भाविक देखील गावात दाखल झाले आहेत. बुधवारपासून गर्दीमध्ये वाढ होणार आहे. यात्रेनिमित्त राज्य परिवहन मंडळाने जादा बसेसची सोय केली असून नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.









